येथे नमूद केलेले नियम व अटी (यापुढे " नियम व अटी " म्हणून संदर्भित केलेल्या ) "प्रीपेड जीपीआर कार्ड" च्या वापरासाठी लागू आहेत, आणि त्यांना त्यांचा वापर करण्यापूर्वी मान्य करणे व स्वीकारणे आवश्यक आहे. खाली नमूद केलेल्या आणि येस बँकेने त्यांच्या अखत्यारीत वेळोवेळी सुधारीत केलेल्या नियम व अटी या "प्रीपेड जीपीआर कार्ड" च्या संबंधात आपण आणि येस बँक यांच्यातील संपूर्ण करार आणि / किंवा होणा-या व्यवस्थेच्या अंग असतील. जीपीआर
"प्रीपेड जीपीआर कार्ड" घेण्यासाठीची साइन-अप प्रक्रिया पूर्ण केल्यावर, आपण येथे उल्लेख केलेला प्रत्येक नियम व अट आपण स्पष्टरित्या वाचली, समजली आणि स्वीकारल्याचे मानले जाते.आपण हे मान्य करीत आहात की येस बँकेने त्यांच्या अखत्यारीत वेळोवेळी सुधारीत केलेल्या आणि येथे उल्लेख केलेले सर्व नियम व अटी आपल्यास बंधनकारक आहेत.
येस बँकेने दिलेली नोटीस, दिलेल्या तारखेपासून सात (७) दिवसांत किंवा येस बँकेने ग्राहकाला त्याच्या नोंदणीकृत ई-मेल किंवा मेलिंग पत्त्यावर किंवा बँकेकडे उपलब्ध असलेल्या ईमेलद्वारे पाठवलेली ई मेल ग्राहकाने प्राप्त केली आहे असे मानले जाईल.
ग्राहकाने दिलेली कोणतीही नोटीस, ही बँकेचे कॉर्पोरेट कार्यालय, पत्ता - 15 व्या मजल्यावर, इंडियाबुल्स फायनान्शियल सेंटर, सेनापती बापट मार्ग, एल्फिन्स्टन (डब्ल्यू) येथे अशी नोटीस बँकेला मिळाल्याची पोच पावती असल्यासच केवळ येस बँकेने प्राप्त केली आहे असे मानले जाईल.
ग्राहकाकडून आलेली कोणतीही नोटीस किंवा दळणवळण हे येस बँकेवर बंधनकारक असणार नाही जोपर्यंत ते लिखित स्वरूपात नसेल आणि येस बँकेकडून त्याची पोच पावती नोंदणीकृत पोस्ट ऑफिस मधून झाली नसल्यास.
ग्राहक प्रीपेड जीपीआर कार्डच्या सुरक्षेसाठी जबाबदार असतो आणि प्रीपेड जीपीआर कार्डचा गैरवापर केला जात नाही हे सुनिश्चित करण्यासाठी त्याने सर्व आवश्यक पावले उचलली पाहिजेत. येस बँकेला जर असे लक्षात आले किंवा त्यांना माहिती झाले की ग्राहकाच्या दुर्लक्षामुळे किंवा वरील खबरदारी न घेतल्यामुळे किंवा जबाबदारी नाकारल्यामुळे ग्राहकाकडून प्रीपेड जीपीआर कार्ड हरवले, चोरी किंवा नुकसान झाले तर ते प्रीपेड जीपीआर कार्ड रद्द किंवा निरस्त करण्याचे अधिकार येस बँकेला आहेत.
1. पुरविलेल्या कोणत्याही वस्तू किंवा सेवांमध्ये कोणताही दोष.
2. गुणवत्ता, मूल्य हमी, पोहोचवण्यात विलंब, वस्तू न पोहोचवणे किंवा न मिळणे यासंबंधित कोणतेही वाद.
3. कोणत्याही व्यक्तीने प्रीपेड जीपीआर कार्डचा सन्मान करणे किंवा स्वीकारण्यास नकार देणे.
4. कोणत्याही कारणास्तव, प्रीपेड जीपीआर कार्ड योग्यरित्या कार्य करीत नाही किंवा एटीएम कोणत्याही कारणास्तव, योग्यरित्या कार्य करीत नाही.
5. कोणत्याही संगणक टर्मिनलमधील बिघाड.
6. कोणतीही नैसर्गिक आपत्ती.
7. प्रीपेड जीपीआर कार्डचे कोणत्याही तृतीय पक्षाकडे हस्तांतरण.
8. ग्राहकाद्वारे प्रीपेड जीपीआर कार्ड बंद करणे.
9. येस बँकेद्वारे प्रीपेड गिफ्ट कार्डच्या पुन: मालकीमुळे उद्भवलेल्या तक्रारीमध्ये ग्राहकाला झालेला तोटा किंवा नुकसान.
10. ग्राहकाकडून या संदर्भात सूचना मिळाल्यानंतर प्रीपेड गिफ्ट कार्डला नेमून दिलेल्या रकमेतील कोणत्याही प्रकारची विसंगती.
11. ग्राहकाच्या विनंतीवरून प्रीपेड जीपीआर कार्ड वर केलेले कोणतेही उलट कार्य.
प्रीपेड जीपीआर कार्डवर मिळणारे फायदे आणि वैशिष्ट्ये बदलण्याचे पूर्ण हक्क येस बँके राखून ठेवते,यात व्याज आकारणी किंवा दर आणि गणना पद्धतींचा समावेश असेल पण त्यापुरतीच मर्यादितता नसेल.
Type of charges | Charges –Amount* |
Card issuance Fees | INR 150 |
Replacement Fees | INR 150 |
Balance enquiry charges | 0 |
*GST will applied additional on above mentioned charges.
तथापि प्रीपेड जीपीआर कार्ड वर केल्या जाणाऱ्या कोणत्याही व्यवहारावर येस बँकेला लागू असलेल्या कायद्यांनुसार कर वजावट स्त्रोतातून कर वजा करण्यास इथे उल्लेख केलेले काहीही अटकाव करू शकत नाही